एकाच इमारतीखालून दोन मोटारसायकली लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 17:53 IST2020-12-20T17:53:21+5:302020-12-20T17:53:46+5:30
ओझरटाऊनशिप : एका इमारतीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या दोन मोटारसायकली अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ओझर येथे घडली.

एकाच इमारतीखालून दोन मोटारसायकली लंपास
शुक्रवारी (दि. १८) रात्री ११ ते दि. १९ रोजी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान संजय भिका सोनवणे (रा. श्रीराज हाईट /ए) यांनी त्यांची बजाज कंपनीची कावासाकी फोर एस चॅम्पियन मोटारसायकल (एम एच १९ के ९०९६) व हरीश दशरथ जेजुरकर यांची बजाज डिस्कव्हर डीटीएस मोटारसायकल (एम एच १५ सीपी ५४१४) ही दोन वाहने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे सकाळी निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी मोटारसायकलींचा कालपर्यंत सर्वत्र शोध घेतला; परंतु मिळून आल्या नाहीत. सोनवणे यांनी तसेच जेजुरकर यांच्यावतीने पवन नवघीरे यांनी मोटारसायकल चोरीस गेल्याची तक्रार नोंदविल्याने ओझर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड करीत आहेत.