युवकाकडून दोन लाखांचे सतरा मोबाइल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 00:44 IST2018-07-31T00:44:33+5:302018-07-31T00:44:50+5:30

रस्त्याने पायी पायी मोबाइलवर बोलत जाणाऱ्या नागरिक व महिलांच्या हातातील मोबाइल हिसकावून धूमस्टाइल पळून जाणाºया युवकाला पकडून त्याच्याकडून सुमारे दोन लाख रुपये किमतीचे चोरलेले १७ मोबाइल जप्त केले आहेत.

 Two million saturated mobile seized from youth | युवकाकडून दोन लाखांचे सतरा मोबाइल जप्त

युवकाकडून दोन लाखांचे सतरा मोबाइल जप्त

नाशिकरोड : रस्त्याने पायी पायी मोबाइलवर बोलत जाणाऱ्या नागरिक व महिलांच्या हातातील मोबाइल हिसकावून धूमस्टाइल पळून जाणाºया युवकाला पकडून त्याच्याकडून सुमारे दोन लाख रुपये किमतीचे चोरलेले १७ मोबाइल जप्त केले आहेत.  रस्त्याने पायी जाणाºया महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओढून चोरून नेण्याचा प्रकार घडत होता. त्याचप्रमाणे गेल्या काही महिन्यांत रस्त्याने पायी-पायी मोबाइलवर बोलत जाणाºया नागरिक, महिलांच्या हातातील महागडे मोबाइल चोरून नेण्याच्या घटनादेखील वाढीस लागल्या होत्या. दुचाकीवर येऊन पायी बोलत जाणाºया व्यक्तिच्या कानाजवळील मोबाइल हिसकावून धूमस्टाइल पळून जाणाºया संशयितांचा पोलीस सर्वत्र कसोशीने शोध घेत होते. उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार उपनिरीक्षक गणेश जाधव, महेश शिंदे, हवालदार सुनील कोकाटे, के.टी. गोडसे, किरण देशमुख, विलास गिते, अनिल शिंदे, समीर चंद्रमोरे, प्रजित ठाकूर, प्रदीप बाहुले, अमोल टिळेकर यांनी रविवारी सत्कार पॉर्इंट देवळालीगाव येथे सापळा रचून संशयित शिबान शफी शेख (वय १९, रा. शेख मंजिल, सत्कार पॉर्इंट देवळालीगाव) यास पकडून त्याची कसून चौकशी केली असता त्याने रस्त्याने पायी बोलत जाणाºयांचे मोबाइल हिसकावून चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून एक लाख ९५ हजार रुपये किमतीचे १७ चोरीचे मोबाइल जप्त करण्यात आले  आहे.

Web Title:  Two million saturated mobile seized from youth