मालेगावी गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोनजण जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 18:18 IST2018-11-07T18:18:08+5:302018-11-07T18:18:52+5:30
मालेगाव : शहरातील मोमीनपुरा भागात अवैधरित्या गावठी कट्टे (अग्निशस्त्रे) बाळगणाºया दोघा संशयीतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालेगावी गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोनजण जेरबंद
मालेगाव : शहरातील मोमीनपुरा भागात अवैधरित्या गावठी कट्टे (अग्निशस्त्रे) बाळगणाºया दोघा संशयीतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक काल मंगळवारी रात्री गस्त घालीत असताना अवैधरित्या गावठीकट्टे बाळगुन काही संशयित गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोमीनपुरा भागात सापळा रचून संशयीत मोहंमद शोएब शौकत हुसेन (२२) रा. मोमीनपुरा एकतारा बिल्डींग व मोईन मोहंमद अनीस (२४) रा. अख्तराबाद यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातुन एक देशी बनावटीचे पिस्टल, होण्डाशाईन दुचाकी जप्त करण्यात आली. आरोपींकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणताही शस्त्र परवाना मिळून आला नाही. सदरचे पिस्टल हे त्यांचा मित्र शहजाद (पूर्ण नाव माहित नाही) रा. मिल्लतनगर मदरशा जवळ याच्याकडून घेतल्याचे समजले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहजादचा शोध घेत असून विनापरवाना बेकायदेशीररित्या गावठी कट्टे बाळगल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक करपे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनिल अहिरे, हवालदार राजु मोरे, वसंत महाले, सुहास छत्रे, राकेश उबाळे, देवा गोविंद, पोलीस कर्मचारी फिरोज पठाण, रतीलाल वाघ यांच्या पथकाने ही कारवाई केली.