दोन लाखांचे चोरीचे दागिने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 23:21 IST2020-07-27T21:57:12+5:302020-07-27T23:21:56+5:30

नाशिकरोड : विहितगाव, बागुलनगर येथे आठ दिवसांपूर्वी चोरी झालेले सव्वादोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी घरमालकाकडे काम करणाऱ्या मुलाकडून हस्तगत केले आहेत.

Two lakh stolen jewelery seized | दोन लाखांचे चोरीचे दागिने जप्त

दोन लाखांचे चोरीचे दागिने जप्त

ठळक मुद्दे चोºया वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : विहितगाव, बागुलनगर येथे आठ दिवसांपूर्वी चोरी झालेले सव्वादोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी घरमालकाकडे काम करणाऱ्या मुलाकडून हस्तगत केले आहेत.
विहितगाव बागुलनगरमध्ये राहणारे अमिरा शरीफ खान यांच्या घरातून गेल्या शुक्रवारी एक लाख रुपये रोख व एक लाख २७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. या चोरीबाबत खान यांनी घरात काम करणाºया ऋतिक शिरसाट याच्याबाबत संशय व्यक्त केला होता.
त्यावरून नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंद्रकांत गायकवाड यांनी ऋतिक शशिकांत शिरसाट यास ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने चोरी केल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली रोख रक्कम व दागिने जप्त केले आहेत. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिकरोड, जेलरोड, विहितगाव आदी परिसरात भुरट्या चोºया वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Web Title: Two lakh stolen jewelery seized