नांदगावी दोन लाखांची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 00:28 IST2020-12-21T20:22:07+5:302020-12-22T00:28:45+5:30
नांदगांव : शहरातील भोंगळे रस्त्यावर चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा तोडून १ लाख ९१ हजार सातशे पन्नास रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने व ४० हजारांची रोख रक्कम चोरल्याची घटना घडली.

नांदगावी दोन लाखांची घरफोडी
नांदगांव : शहरातील भोंगळे रस्त्यावर चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा तोडून १ लाख ९१ हजार सातशे पन्नास रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने व ४० हजारांची रोख रक्कम चोरल्याची घटना घडली.
सोन्याचा नेकलेस, वेल, कानातले जोड, कच्चा सोन्याचा तुकडा, चांदीचे हाता पायातले सहा कडे असा ऐवज चोरीला गेला.
फळ विक्रेते विनोद मोरे हे परिवारासमवेत गुजराथ राज्यात देवमोगरा येथे कुलदेवता मोगी माता यांच्या दर्शनासाठी शुक्रवारी (दि.१८) गेले होते. रविवारी (दि.२०) मोरे यांच्या वडीलांच्या मोबाईलवर जावेद यांनी फोन करून घराचा कडी कोंडा तुटला असून घरात सामान अस्ताव्यस्त पडले असल्याचे कळवले. त्यानंतर तातडीने मोरे परिवार नांदगावी परतले असता घरफोडी होवून लाखोंचा ऐवज चोरी झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी मोरे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.