करंजाळीनजीक दुचाकींच्या धडकेत दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 16:38 IST2021-06-16T16:35:20+5:302021-06-16T16:38:58+5:30
पेठ : नाशिक ते पेठ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ वर पेठ तालुक्यातील करंजाळी वनविभागाच्या रोपवाटिकेजवळ दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोन ठार, तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

करंजाळीनजीक दुचाकींच्या धडकेत दोन ठार
पेठ : नाशिक ते पेठ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ वर पेठ तालुक्यातील करंजाळी वनविभागाच्या रोपवाटिकेजवळ दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोन ठार, तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
पेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (दि. १५) रात्री नाशिककडून करंजाळीकडे येणारी दुचाकी डिस्कवरी (एमएच-१५- सीएक्स -३१४) व करंजाळीकडून नाशिककडे जाणारी दुचाकी शाईन (एमएच-१५-सीझेड-९५५३) यांच्यात राष्ट्रीय महामार्गावर वनविभागाच्या नर्सरीजवळ समोरासमोर धडक झाली. यामध्ये बाळू रामदास थाळकर (वय ३२, रा. हेदपाडा) व युवराज मोतीराम बोंबले (२२, रा. लिंगवणे) हे दोघे ठार झाले. सुनील हरिदास म्हसरे हा जखमी झाला.
याबाबत रामदास लक्ष्मण दरोडे, रा. हेदपाडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक ए. सी. जाडर पुढील तपास करीत आहेत.