दुचाकीच्या धडकेने विद्यार्थी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 13:22 IST2020-01-03T13:19:18+5:302020-01-03T13:22:11+5:30

त्र्यंबकेश्वर : नाशिक- त्र्यंबक रस्त्यावर दुचाकीने दिलेल्या धडकेत विद्यार्थी ठार झाला.

 Two killed in motorcycle collision | दुचाकीच्या धडकेने विद्यार्थी ठार

दुचाकीच्या धडकेने विद्यार्थी ठार

त्र्यंबकेश्वर : नाशिक- त्र्यंबक रस्त्यावर दुचाकीने दिलेल्या धडकेत विद्यार्थी ठार झाला. ऋत्विक जगन्नाथ रेणुके असे मृताचे नाव आहे. कपड्यांचे व्यापारी आनंदा केशव रेणुके आपले त्र्यंबकेश्वर येथील काम आटोपुन गुरूवारी सायंकाळी नाशिक येथे दुचाकी क्र . एमएच १५ बीपी १६९५ वरून जात असतांना ब्रम्हाव्हॅली शैक्षणिक संकुलासमोर उभ्या असलेल्या संकेत रणजित गुंजाळ (२३ रा.दुधगंगा सोसायटी, आकाश गंगा पेट्रोलपंपा जवळ दिंडोरी रोड नाशिक) या विद्यार्थ्यास धडक दिल्याने गंभीर जखमी झाला. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेला ऋत्विक जगन्नाथ रेणुके (२१) हा दुचाकी वरु न पडल्याने डोक्यास मार लागुन जागीच ठार झाला. चालक आनंदा केशवराव रेणुके (२७, कथडा टाकळी रोड नाशिक) गंभीर जखमी झाला आहे. दोघांवर नाशिक येथील खाजगी रु ग्णालयात उपचार सुरू आहेत. ऋत्विक याच्या मृत्युस कारणीभुत दुचाकी चालकाविरु ध्द संकेत रणजित गुंजाळ याने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याबाबतचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे करीत आहेत.

Web Title:  Two killed in motorcycle collision

टॅग्स :Nashikनाशिक