तांदूळवाडी शिवारात अपघातात दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2022 00:16 IST2022-01-23T00:16:53+5:302022-01-23T00:16:53+5:30
नांदगाव : नांदगाव-येवला रस्त्यावरील तांदूळवाडी शिवारात शुक्रवारी (दि.२१) रात्री मोटारसायकल व ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना घडली आहे.

तांदूळवाडी शिवारात अपघातात दोन ठार
ठळक मुद्देया अपघातात गंभीर मार लागून जखमी झाल्याने दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला.
नांदगाव : नांदगाव-येवला रस्त्यावरील तांदूळवाडी शिवारात शुक्रवारी (दि.२१) रात्री मोटारसायकल व ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना घडली आहे.
योगेश वेडू बुरुंगले (३२, रा. पारेकर वस्ती, नांदूर ता. नांदगाव) व बाबूलाल विठ्ठल बिडकर (४५, रा. कुंदलगाव, ता. चांदवड) हे मोटारसायकलने नांदगावकडून येवल्याकडे जात होते. याच वेळी तांदूळवाडी फाट्याजवळ उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला ही दुचाकी जाऊन धडकली. या अपघातात गंभीर मार लागून जखमी झाल्याने दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला. नांदगाव पोलिसात या अपघाताचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.