वणीजवळ वेगवेगळ्या अपघातात दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 13:03 IST2018-12-26T13:03:00+5:302018-12-26T13:03:06+5:30
वणी : भरधाव वेगातील दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू झाला.

वणीजवळ वेगवेगळ्या अपघातात दोन ठार
वणी : भरधाव वेगातील दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू झाला. योगेश सुरेश नंदाळ (३२) राहणार मोरेनगर कॉलेजजवळ सटाणा हा युवक दुचाकी चालवत नांदुरी वणी रस्त्यावरून येत असताना मांदाणे शिवारातील रस्त्याच्या वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटले व रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन ही दुचाकी धडकली. त्या अपघातात योगेश यांचा मृत्यु झाला. दुसऱ्या एका घटनेत दिंडोरी तालुक्यातील दहीवी परिसरात दुचाकीने पायी चालणा-या इसमास धडक दिल्याने तो ठार झाला. याबाबत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिरामन उर्फ दिपक लक्ष्मण बागुल राहणार दहीवी हे एमएच १५ बीव्ही ३०८९ या क्र मांकाची दुचाकी घेऊन कोशिंबे ते लखमापुर या मार्गावरु न जात होते. दहीवी रस्त्यावरून पुढे पायी चालणारे वामन संतु महाले (५५) रा.खेडले यांना धडक दिली. त्यात महाले ठार झाले.