स्कूल बसच्या अपघातात दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 19:11 IST2020-03-03T19:10:33+5:302020-03-03T19:11:08+5:30
नाशिकरोड : जेलरोड शिवाजीनगर येथील मनपाच्या समाज मंदिराजवळील चौकात विद्यार्थी वाहतूक करणाया बसने अॅक्टिवाला धडक दिल्याने शालिमार येथील युवक ...

स्कूल बसच्या अपघातात दुचाकीस्वार ठार
नाशिकरोड : जेलरोड शिवाजीनगर येथील मनपाच्या समाज मंदिराजवळील चौकात विद्यार्थी वाहतूक करणाया बसने अॅक्टिवाला धडक दिल्याने शालिमार येथील युवक गंभीर जखमी होऊन जागीच फार झाला.
शालिमार येथील वारेलेफ येथे राहणारा युवक धनंजय बाबूगिर गोसावी (३८) हा मंगळवारी सकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास आपली अॅक्टिवा (एम एच १५ /बीएच ७४७१) हिच्यावरून जेलरोड शिवाजीनगर मनपा समाज मंदिर येथील चौकातून उजव्या बाजूला वळत होता. यावेळी माळी कॉलनी कडून आलेली विद्यार्थी वाहतूक करणारी बस (एमएच१५ जीव्ही/ ४२९२) ही शिवाजीनगर बस थांबा कडे जाण्यासाठी वळत असताना अॅक्टिवाला जोरदार धडक दिली. यामध्ये धनंजय गोसावी खाली पडल्याने त्याच्या डोक्यातील हेल्मेट देखील दुसरीकडे पडले. यामुळे धनंजयच्या डोक्यास गंभीर मार लागून तो जागीच ठार झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात बस चालक आकाश मधुकर गांगुर्डे रा. जेतवननगर, नाशिकरोड याच्याविरु ध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय याच्या पश्चात पत्नी, लहान मुलगा व मुलगी असा परिवार आहे.