विल्होळीजवळ अपघातात दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 15:46 IST2020-06-12T15:43:42+5:302020-06-12T15:46:26+5:30
विल्होळी : मुंबई-आग्रा महामार्गावरील विल्होळी शिवारात दोन वेगवेगळ्या झालेल्या अपघातात दोघे जण ठार झाल्याची घटना घडली असून, यात एक जण आंबेबहुला येथील तरुणाचा समावेश आहे.

विल्होळीजवळ अपघातात दोन ठार
विल्होळी : मुंबई-आग्रा महामार्गावरील विल्होळी शिवारात दोन वेगवेगळ्या झालेल्या अपघातात दोघे जण ठार झाल्याची घटना घडली असून, यात एक जण आंबेबहुला येथील तरुणाचा समावेश आहे.
पहिला अपघात विल्होळी उड्डाणपुलावर रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडला. नाशिककडून मुंबईकडे जाणारी मारुती कार (क्रमांक एम. एच. १५-५८३६) चा चालक राहुल नंदू डगळे (२१) रा. आंबेबहुला याचे नियंत्रण सुटल्याने कारने पुलाच्या कथड्याला धडक दिली. त्यात कार रस्त्याच्या कडेला उलटून त्यात चालक राहुल डगळे याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी नाशिक तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरा अपघात विल्होळी गावाजवळच अनिल भावनाथ यांच्या गॅरेजसमोर झाला. रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत अज्ञात व्यक्ती ठार झाल्याची घटना घडली आहे. सदर व्यक्तीची ओळख पटलेली नाही मात्र त्याचे अंदाजे ४२ वय असून, अंगात सफेद शर्ट व काळसर रंगाची पॅन्ट आहे. सदर व्यक्तीची ओळख पटविण्याचे आवाहन तालुका पोलिसांनी केले आहे.