कसारा घाटात ट्रक अपघातात दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 00:05 IST2020-08-29T00:04:38+5:302020-08-29T00:05:00+5:30
नवीन कसारा घाटात उतारावर कांद्याने भरलेला ट्रक ब्रेक निकामी झाल्याने डोंगराच्या भिंतीवर जाऊन आदळला. या अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

कसारा घाटात ट्रक अपघातात दोघे जखमी
नांदूरवैद्य : नवीन कसारा घाटात उतारावर कांद्याने भरलेला ट्रक ब्रेक निकामी झाल्याने डोंगराच्या
भिंतीवर जाऊन आदळला. या अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
नाशिक येथून मुंबईकडे कांदे घेऊन जाणाऱ्या ट्रकचे (क्र. एमएच १५ ईजी ५८८) ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यातून डोंगराच्या भिंतीला धडकला. ट्रक एका बाजूने पूर्णत: दाबला गेल्यामुळे चालक त्यात अडकला होता. दरम्यान रुट पेट्रोलिंग आॅफिसर रवि देहाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कांद्यांनी भरलेला ट्रक खाली केला व गॅस कटरच्या साहाय्याने ट्रकचा पत्रा कापून चालकास बाहेर काढले. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नांनंतर चालकाची सुटका करण्यात आली. या अपघातात चालक व आणखी एक जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.