राहूड शिवारात ट्रक उलटून दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2022 01:31 IST2022-05-07T01:31:26+5:302022-05-07T01:31:48+5:30
चांदवड तालुक्यातील राहुड शिवारात महामार्गावर ट्रक पलटी झाल्याने दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमीवर चांदवड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राहूड शिवारात ट्रक उलटून दोन जखमी
चांदवड : तालुक्यातील राहुड शिवारात महामार्गावर ट्रक पलटी झाल्याने दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमीवर चांदवड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईहून इंदोर येथे घरगुती सामान घेऊन जात असताना राहूड शिवारात एक ट्रक शुक्रवारी पहाटे पाच वाजता उलटला. त्यात देवानसेठ कमलसेठ (२५ ) रा . इंदोर तर आणखी एक जण जखमी झाला. त्यांचे वर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात डॉ . दळवी यांनी उपचार केल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.