सिन्नर रस्त्यावर अपघातात दोघा मित्रांचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 01:47 IST2020-09-02T23:44:17+5:302020-09-03T01:47:45+5:30
सिन्नर : सिन्नर-शिर्डी महामार्गावर दुचाकी डंपरवर आदळून झालेल्या अपघातात तालुक्यातील पांगरी येथील दोघा मित्रांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी (दि. २) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास वावी व पांगरीदरम्यान शिंदे वस्तीजवळ सदर अपघात झाला.

सिन्नर रस्त्यावर अपघातात दोघा मित्रांचा जागीच मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : सिन्नर-शिर्डी महामार्गावर दुचाकी डंपरवर आदळून झालेल्या अपघातात तालुक्यातील पांगरी येथील दोघा मित्रांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी (दि. २) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास वावी व पांगरीदरम्यान शिंदे वस्तीजवळ सदर अपघात झाला.
पांगरी येथील अभिषेक पांगारकर (२२) व नीलेश साहेबराव पवार (२२) हे दोघे मित्र पल्सर मोटारसायकलने (क्र. एमएच १५ जीडब्लू ४८९९) पांगरीकडून वावीकडे येत असताना शिंदे वस्तीजवळ नादुरुस्त डंपर उभा होता.
या डंपरवर दुचाकी धडकल्याने त्यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वावी पोलिसांनी दिली. सिन्नर रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर पांगरी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे
यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप शिंदे अधिक तपास करीत आहेत.