साकोरा परिसरात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 17:50 IST2019-04-26T17:49:22+5:302019-04-26T17:50:50+5:30
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा व मुळडोंगरी येथील दोन शेतकऱ्यांनी शुक्रवारी (दि.२६) सकाळी सततची नापिकी जमिन आणि कर्जाच्या ओझ्यामुळे एकाने रेल्वेखाली तर दुसºयाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

दत्तु एकनाथ बोरसे
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा व मुळडोंगरी येथील दोन शेतकऱ्यांनी शुक्रवारी (दि.२६) सकाळी सततची नापिकी जमिन आणि कर्जाच्या ओझ्यामुळे एकाने रेल्वेखाली तर दुसºयाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नांदगाव तालुक्यात गतवर्षी अवघा ३० टक्के झालेल्या पावसामुळे शेतीतून एक रूपयांचे उत्पन्न न मिळाल्याने शेतकरी दुष्काळी परिस्थितीशी सामना करण्यास हतबल झाला आहे. नऊ महिन्यांपूर्वी साकोरा येथिल दोन कर्जबाजारी शेतकºयांनी रेल्वेखाली उडी घेवून आत्महत्या केली होती. शुक्र वारी सकाळी साकोरा येथील दत्तु एकनाथ बोरसे (४०) ह्या युवा शेतकºयांने आपल्या हिरो-होंडा एम एच ३९६४ या मोटारसायकलवर प्रवास करून सततची नापिकी आणि तीन लाख रु पये उसनवार तसेच सोने तारण कर्जाला कंटाळून चाळीसगांव ते नांदगाव रेल्वेलाइनवर नासिककडे जाणाºया रेल्वेखाली उडी घेवून आत्महत्या केली. बोरसे यांचे नावावर चार एकर जमीन आहे. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
तर साकोºयापासून सात किलोमीटर अंतरावर मुळडोंगरी तांडा येथील रतन पुना चव्हाण (६५) ह्या वयोवृद्ध शेतकºयांने सततची नापिकी जमिन आणि सुमारे विस लाख रुपये खाजगी कर्जाच्या ओझ्यामुळे शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. चव्हाण यांच्या नावावर देखिल चार एकर शेतजमीन होती. गुरुवार शेती विक्र ीचा अपूर्ण व्यवहार झाल्याची चर्चा देखिल सुरू होती. या दोन शेतकºयांनी एकाच दिवशी आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
(फोटो २६ बोरसे, २६ चव्हाण)