पाण्याच्या शोधार्थ दोन हरणांचा विहिरीत पडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 13:30 IST2019-04-12T13:29:43+5:302019-04-12T13:30:11+5:30

नांदगाव : तालुक्यातील कही येथे पिण्याच्या पाण्याच्या शोधात दोन हरणांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. कही या गावी पाण्याच्या शोधार्थ शुक्रवारी सकाळी पाच हरणांचा कळप गावाकडे आला.

Two deer stairs fall into the well in search of water | पाण्याच्या शोधार्थ दोन हरणांचा विहिरीत पडून मृत्यू

पाण्याच्या शोधार्थ दोन हरणांचा विहिरीत पडून मृत्यू

नांदगाव : तालुक्यातील कही येथे पिण्याच्या पाण्याच्या शोधात दोन हरणांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. कही या गावी पाण्याच्या शोधार्थ शुक्रवारी सकाळी पाच हरणांचा कळप गावाकडे आला. मानवी वस्तीत ते पिण्यासाठी पाणी शोधत असतांना कुञ्यांनी हरणांवर हल्ला करताच ती पाचही हरणे घाबरलेल्या अवस्थेत पळाली. ती पाचही हरणे अचानक विहिरीत पडली. त्यांना नागरिकांच्या मदतीने विहीरीतुन बाहेर काढले असता त्यात दोघांचा मृत्यू झाला. व तिन हरणांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले. बाहेर काढताच तिनही हरणे जंगलाकडे पळाली. तालुक्यातील जंगलात सध्या पाणी नाही व वन्यप्राण्यांना चारा देखील नाही. दुर पर्यंत हिरवे झाड देखील दिसत नाही. वन्यप्राणी कुठेतरी दगडाच्या किंवा खुरट्या झाडाच्या आडोशाला सावलीत बसतात.त्यांना जंगलात पिण्यासाठी पाणी व गवत देखील नसल्याने हरिण, लांडगे ,कोल्हे,व मोर सध्या मानवी वस्तीकडे धाव घेताना दिसत आहे. दोन महिन्याच्या कालावधीत रस्ता ओलांडतांना सात हरणांचा अपघाती मृत्यू झाला आहे.

Web Title: Two deer stairs fall into the well in search of water

टॅग्स :Nashikनाशिक