दोन दिवसांपासून थंडीचा जोर झाला कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:22 IST2018-12-26T00:03:09+5:302018-12-26T00:22:30+5:30
मागील काही दिवसांपासून नाशिककर कडाक्याच्या थंडीने गारठले होते. या हंगामात नाशिकच्या किमान तापमानाचा पारा ७.९ अंशांपर्यंत खाली घसरला होता. हंगामातील ही सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली.

दोन दिवसांपासून थंडीचा जोर झाला कमी
नाशिक : मागील काही दिवसांपासून नाशिककर कडाक्याच्या थंडीने गारठले होते. या हंगामात नाशिकच्या किमान तापमानाचा पारा ७.९ अंशांपर्यंत खाली घसरला होता. हंगामातील ही सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली. वाढत्या थंडीच्या कडाक्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागल्याने थंडीपासून दिलासा कधी मिळेल? याची प्रतीक्षा नागरिक करत होते. दोन दिवसांपासून किमान तापमानाचा पारा वाढू लागल्यामुळे थंडीची तीव्रताही कमी झाल्याचा अनुभव नागरिकांना येऊ लागला आहे.
आठवडाभरापासून शहराच्या किमान तापमानाचा पारा दहा अंशांच्या खाली स्थिरावत होता. यामुळे थंडीची तीव्रता अधिक जाणवत होती. बुधवारी (दि.१९) पारा अचानक ७.९ अंशांपर्यंत खाली घसरला होता. मागील वर्षाच्या नीचांकी तापमानाचा विक्रम यावर्षी लवकरच मोडीत निघण्याची चिन्हे दिसू लागली होती; मात्र ७.९ अंशांपर्यंत पारा खाली घसरला. त्यानंतर पुन्हा किमान तापमानाचा पारा वर येऊ लागल्याने थंडीची तीव्रताही हळूहळू कमी होत चालली आहे. मंगळवारी (दि.२५) किमान तापमानाचा पारा १४.३ अंशांपर्यंत वर सरकला. एकूणच कमाल तापमानाचा पारादेखील २५ अंशांवरून पुढे सरकत असल्याने थंडीचा जोर सध्या कमी झाला आहे. कमाल तापमान तीस अंशांपर्यंत आले असून, किमान तापमानदेखील १४ अंशांपर्यंत आल्याने थंडीची तीव्रता कमी झाल्याचा नागरिक अनुभव घेत आहे. सोमवारी शहरात दुपारपासून ढगाळ हवामान दाटल्यामुळे कमाल तापमानात वाढ होऊन थंडी गायब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. थंडीची तीव्रता घटल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. कमाल तापमानाचा पारा अधिक वर सरकण्याची चिन्हे आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरच्या २९ तारखेला ७.५ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले होते.
सर्दी-पडशाचे रुग्ण घटणार
नागरिकांना बोचऱ्या थंड वाºयाचा सामना करावा लागत होता. त्यामुळे नागरिक दिवसभर उबदार कपडे परिधान करून बोचºया वाºयापासून बचाव करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत होते. सध्या दोन दिवसांपासून थंडीचा जोर कमी झाल्याने आता चित्र बदलले आहे. थंडीचा कडाक्यामुळे शहरात सर्दी-पडशासह तापाचे रुग्णही वाढले होते.
सरकारी व खासगी दवाखान्यांमध्ये वाढलेली रुग्णसंख्या नियंत्रणात येण्याची शक्यता आहे.
यावर्षी ७.९ ही हंगामातील सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली. थंडीच्या काडाक्याने शहरासह ग्रामीण भागदेखील गारठला होता.
४निफाड, इगतपुरी, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, पेठ, दिंडोरी या तालुक्यामध्येही थंडीची तीव्रता अधिक जाणवत होती. द्राक्षबागायतदार थंडीच्या कडाक्यामुळे धास्तावले होते.