Video : हॉलिडे एक्स्प्रेसचे घसरलेले डबे हटविले; वाहतूक ठप्प झाल्याने एक्स्प्रेस खोळंबल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2019 11:55 IST2019-06-02T09:56:08+5:302019-06-02T11:55:23+5:30
हॉलिडे एक्स्प्रेस बरेलीहून मुंबईला येत होती.

Video : हॉलिडे एक्स्प्रेसचे घसरलेले डबे हटविले; वाहतूक ठप्प झाल्याने एक्स्प्रेस खोळंबल्या
नाशिक : बरेली येथून मुंबई कडे जाणाऱ्या 02062 या धावत्या हॉलिडे एक्स्प्रेसच्या एसी डब्याचे चाक तुटल्याची धक्कादायक घटना आज सकाळी नांदगांव रेल्वे स्टेशन जवळ घडली. या अपघातामुळे मुंबई कडे जाणारी वाहतूक ठप्प झाली असून मोठा अपघात टळला आहे.
हॉलिडे एक्स्प्रेस बरेलीहून मुंबईला येत होती. यावेळी नांदगाव स्थानकावर दोन डबे रुळावरून घसरल्याने अपघात झाला आहे. रेल्वेच्या चाकाला तडे गेल्याने चाक तुटले होते. यामुळे डबे घसरल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली असून अद्याप हानी किंवा कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही. चाक तुटले तेेव्हा गाडीचा वेग कमी होता. त्यामुळे मोठी दुर्घटना टळून गाडीतील प्रवाशांचा जीव वाचला.
नाशिकमध्ये घसरलेले रेल्वेचे डबे हटविले; उत्तर महाराष्ट्रातून येणाऱ्या लोकल खोळंबल्या आहेत. कामायनी, झेलम, संचखंड, हातिया एक्स्प्रेस रखडल्या असून भुसावळ-मुंबई रेल्वेसेवेवरही परिणाम झाला आहे.