शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात घरफोडीच्या दोन घटनांमध्ये लाखोंच्या दागिन्यांसह रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 16:04 IST

खुटवडनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करीत घरातून १ लाख १० हजार रुपयांचे दागिने लांबविले. तर दिंडोरी रोड भागात घडलेल्या  दुसºया घटनेत  एक दुकान फोडून ८३ हजार रुपये लांबविल्याची घटना घडली आहे. या दोन्ही घटनांमध्ये सुमारे १ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस  गेल्याच्या प्रकरणात अंबड व म्हसरूळ या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देनाशिकमध्य दोन घरफोड्यांमध्ये लाखोंचा एेवज लंपास घरातून १ लाख १० हजार रुपयांचे दागिने लांबविले दुसऱ्या घटनेत एक दुकान फोडून ८३ हजार लंपास

नाशिक : खुटवडनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करीत घरातून १ लाख १० हजार रुपयांचे दागिने लांबविले. तर दिंडोरी रोड भागात घडलेल्या  दुसºया घटनेत  एक दुकान फोडून ८३ हजार रुपये लांबविल्याची घटना घडली आहे. या दोन्ही घटनांमध्ये सुमारे १ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस  गेल्याच्या प्रकरणात अंबड व म्हसरूळ या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.खुटवडनगर येथील शिवकृपा अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी बुधवारी (दि. ३१) अमित वसंतराव पवार यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत दोन तोळे सोन्याची चेन, पाच ग्रॅम वजनाची अंगठी, सोन्याचा हार, कर्णफुलांचा सेट, १५ तोळे वजनाच्या सोन्याच्या बारा बांगड्या, एक तोळे वजनाचा सोन्याचा हार, स्क्रू लॉकिंग सोन्याची बांगडी, आठ तोळे वजनाच्या चार चेन, दोन तोळे वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठ्या, एक सोन्याचा शिक्का असे एक लाख दहा हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी घरफोडी करून लांबविले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शेवाळे तपास करीत आहेत. तर दिंडोरी रोड परिसरातील लक्ष्मी कार मॉलसमोरील सिद्धांत प्लाझा अपार्टमेंटमध्ये दोन नंबरचे दुकान फोडून ८३ हजार रुपयांची चोरी झाल्याची फिर्याद लामखेडे मळ््यातील पुष्पविजय अपार्टमेंटमधील श्रद्धा वैभव मुळे यांनी दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार संशयित अनिता मराठे व रावसाहेब भोसले यांनी दि. ३० व ३१ आॅक्टोबर रोजी मुळे यांच्या सिद्धांत प्लाझामधील अप्पर ग्राऊंड फ्लोअरवर असलेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या दुकानाचे शटरचे बनावट  चावीने खोलून त्यातील ८३ हजार रुपयांची रक्कम लांबविली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोहोकले या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकThiefचोरPoliceपोलिस