नाशिक : शहरातील नवीन नाशिक परिसरात अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दोन घरफोडीत ३१ हजार रुपयांच्या ऐवज चोरट्यांनीचोरून नेल्याची घटना घडल्या आहे. याप्रकरणी बाळासाहेब पांडुरंग गायकवाड (रा. केवल पार्क, दत्तमंदिर स्टॉप) यांनी तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.५) रात्री चोरट्यांनी बाळासाहेब गायकवाड यांच्या घराच्या दरवाजाची जाळी कापून कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील मोबाइल फोन व रोकड असा १६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी सहायक निरीक्षक बेडवाल अधिक तपास करत आहेत, तर दुसरी घटना लेखानगर परिसरात घडली. याप्रकरणी रवींद्र कुवरबाहदूर जयस्वाल यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांचे मिरॅकल मोटर्स स्पेअर पार्टसचे दुकान चोरट्यांनी फोडून येथील १५ हजार रुपयांचे साहित्य लंपास केले. याप्रकरणी दोन्ही प्रकरणांत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. स्पेअर पार्ट दुकानातील चोरीचा तपास सहायक उपनिरीक्षक पावरा करत आहेत.
नाशकातील अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन घरफोड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 17:21 IST
शहरातील नवीन नाशिक परिसरात अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दोन घरफोडीत ३१ हजार रुपयांच्या ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडल्या आहे. शहरात दिवसेंदिवस भुरट्या चोऱ्या आणि घऱफोड्यांच्या घटना वाढल्या असून अशा प्रकारच्या घटनांमध्ये सहभागी असणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांचा वचकच उरला नसल्याच्या प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
नाशकातील अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन घरफोड्या
ठळक मुद्देनवीन नाशिक परिसरातील गुन्हेगारीत वाढअंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन घरफोड्या