मालेगावीे शेततळ्यात पडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 00:23 IST2020-04-04T00:22:38+5:302020-04-04T00:23:16+5:30
शेततळ्यात पाय घसरून पडल्याने मालेगाव तालुक्यातील रामपुरा शिवारात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्र वारी (दि.३) सकाळी घडली.

मालेगावीे शेततळ्यात पडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
मालेगाव : शेततळ्यात पाय घसरून पडल्याने मालेगाव तालुक्यातील रामपुरा शिवारात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्र वारी (दि.३) सकाळी घडली.
किशोर मुरलीधर सोनवणे (३०) व ज्ञानेश्वर मुरलीधर सोनवणे (२७) अशी मृत भावांची नावे आहेत. पिकाला पाणी देण्यासाठी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास हे दोघे शेततळ्याच्या बांधावर चढले. त्यात पाय घसरून एक जण पाण्यात पडल्याने दुसऱ्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असता दोघेही पाण्यात बुडाले व त्यात त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. दोघे भाऊ शेततळ्यात पडल्याचे शेजारच्या शेतात उभ्या असलेल्या मेंढपाळाच्या एका लहान मुलाच्या लक्षात आल्याने त्याने आरडाओरडा केली. त्यांनतर परिसरातील शेतकरी धावून आले, परंतु मदतकार्यासाठी बराच उशीर झाल्याने दोघांचे प्राण वाचवणे शक्य होऊ शकले नाही. घटनेची माहिती मिळताच वडनेर-खाकुर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. किशोर हा विवाहित असून कंक्राळे विद्यालयात उपशिक्षक म्हणून कार्यरत होता.