लाच घेणाऱ्या दोघांची कारागृहात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 03:14 PM2020-06-13T15:14:13+5:302020-06-13T15:17:15+5:30

नाशिक : जिल्ह्यातील शिक्षकांची माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक कर्मचारी सोसायटीत वेतन आयोगाचा फरक देण्याच्या मागणीसाठी लाच घेतल्या प्रकरणी ...

Two bribe takers sent to jail | लाच घेणाऱ्या दोघांची कारागृहात रवानगी

लाच घेणाऱ्या दोघांची कारागृहात रवानगी

Next
ठळक मुद्देसंचालक मंडळ बरखास्त करासंघटनांची मागणी

नाशिक : जिल्ह्यातील शिक्षकांची माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक कर्मचारी सोसायटीत वेतन आयोगाचा फरक देण्याच्या मागणीसाठी लाच घेतल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे. दरम्यान, बहुचर्चित एनडीएसटी सोसायटीतील या गैरप्रकारात संचालक मंडळाचा सहभागी असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती करावी, अशी मागणी सोसायटीच्या सभासदांनी केली आहे.
दोन दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने व्यवस्थापक जयप्रकाश कुंवर व शाखा व्यवस्थापक शरद जाधव या दोघांना १९ हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ अटक केली होती. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. या साºया प्रकरणाची सखोल चौकशी होण्यासाठी विद्यमान संचालक मंडळ तत्काळ बरखास्त करून प्रशासकांची नेमणूक करावी व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विविध संघटना पदाधिकाऱ्यांनी उपनिबंधकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यात म्हटले आहे की, लाचलुचपत विभागाने कारवाई करत दोन अधिकाºयांना अटक केली आहे. प्राथमिक अहवालात संचालक मंडळासाठी वेतन आयोग फरकाची रक्कम जमा करण्यात येत होती, असा जबाब आरोपींनी नोंदविल्याचे समजते. म्हणून संचालक मंडळाची भूमिका संशयास्पद ठरत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व संचालक मंडळाची मुदतवाढ तत्काळ रद्द करून प्रशासकांची नेमणूक करावी, अशी मागणी केली. यावेळी शिक्षक नेते प्रा. श्याम पाटील, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष के. के. अहिरे, साहेबराव कुटे, किरण पगार, राजेंद्र लोंढे, संग्राम करंजकर, संजय पाटील, बाळासाहेब सोनवणे, दत्ता वाघेपाटील, चंद्रशेखर शेलार, सुभाष भामरे आदी उपस्थित होते.

 

Web Title: Two bribe takers sent to jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.