दुचाकी झाडावर आदळून दोघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:36 IST2018-07-25T00:36:08+5:302018-07-25T00:36:21+5:30
पाथर्डी फाट्याकडून वडनेरच्या दिशेने येत असताना मंगळवारी दुपारी श्री सप्तशृंगी फार्मजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर दुचाकी जाऊन आदळल्याने नाशिकरोड परिसरातील दोघे युवक गंभीर जखमी होऊन ठार झाले आहेत.

दुचाकी झाडावर आदळून दोघे ठार
नाशिकरोड : पाथर्डी फाट्याकडून वडनेरच्या दिशेने येत असताना मंगळवारी दुपारी श्री सप्तशृंगी फार्मजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर दुचाकी जाऊन आदळल्याने नाशिकरोड परिसरातील दोघे युवक गंभीर जखमी होऊन ठार झाले आहेत. देवळालीगाव म्हसोबा मंदिर शेजारी राहणारा भूषण सुनील गोसावी (वय २३ रा. देवळालीगाव) व त्याचा मित्र श्रावण ऊर्फ राजू रामेश्वर मरसाळे (वय २३, रा. गोरेवाडी) हे दोघे मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास टीव्हीएस स्टार दुचाकी (एमएच १५ डीजे ३३९८) हिच्यावरून पाथर्डीमार्गे वडनेररोडने घराकडे येत होते. श्री सप्तशृंगी फार्मजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन त्यांची दुचाकी आदळल्याने भूषण गोसावी व श्रावण मरसाळे हे दोघे अत्यंत गंभीर जखमी झाले.
येणाऱ्या-जाणाºया नागरिकांनी दोघा जखमींना त्वरित बिटको रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.