दोन दुचाकीची समोरासमोर धडक; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 18:45 IST2019-01-20T18:45:46+5:302019-01-20T18:45:59+5:30

डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने तरु णप्रताप यांचा मृत्यू झाला. तर कुणालवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Two bikes hit face to face; One killed | दोन दुचाकीची समोरासमोर धडक; एक ठार

दोन दुचाकीची समोरासमोर धडक; एक ठार

नाशिक : दोन दुचाकींची समोरासमोर झालेल्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना गंगापूर रोडवरील आनंदवल्ली परिसरात घडली. गुरु वारी (दि.१८) रात्री ९:३०च्या सुमारास झालेल्या या अपघातात तरु णप्रताप रविंद्रसिंग श्रीखचेडूसिंग (३८, रा. उत्तप्रदेश) यांचा मृत्यू झाला. तरु णप्रताप हे दुचाकीवरून (एमएच१५सीई ८८५०) गंगापूर रोडवरून जात होते. त्यावेळी दुचाकीवरून ( एमएच १५इजे ३३९३) कुणाल दिनेश गवारे (रा. आनंदवल्ली) हा संत कबीर नगरच्या दिशेने भरदाव वेगाने जात होता. त्यावेळी कुणालचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने तो तरुणप्रताप यांच्या दुचाकीवर जाऊन आदळला. त्यात तरुणप्रताप कुणाल हे दोघेही गंभीर जखमी झाले. मात्र डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने तरु णप्रताप यांचा मृत्यू झाला. तर कुणालवर खासगी रु ग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात कुणालविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Two bikes hit face to face; One killed