इगतपुरी महामार्गावर ट्रकमधून डिझेल चोरणारे दोघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2021 00:51 IST2021-11-04T00:50:41+5:302021-11-04T00:51:49+5:30
इगतपुरी येथील नाशिक - मुंबई महामार्गावरील कसारा घाटातील घाटनदेवी मंदिराजवळील रोडच्या साईड पट्ट्यावर उभ्या असलेल्या ट्रकमधून चोरट्यांनी ट्रकचे लॉक तोडून मोबाईल व रोख दहा हजार रुपये व डिझेलची चोरी केली.

इगतपुरी महामार्गावर ट्रकमधून डिझेल चोरणारे दोघे ताब्यात
इगतपुरी : येथील नाशिक - मुंबई महामार्गावरील कसारा घाटातील घाटनदेवी मंदिराजवळील रोडच्या साईड पट्ट्यावर उभ्या असलेल्या ट्रकमधून चोरट्यांनी ट्रकचे लॉक तोडून मोबाईल व रोख दहा हजार रुपये व डिझेलची चोरी केली.
मुंबई - नाशिक हायवेवर खालसा पंजाबी ढाब्यावर उभ्या असलेल्या ट्रकमधून डिझेलची चोरी केली. याप्रकरणी ट्रकचालक हिरालाल धोली राजपूत (३१) याने इगतपुरी पोलिसांकडे फिर्याद दिल्यानंतर इगतपुरी पोलिसांनी चोरट्यांना रंगेहात पकडून ८४ हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
यातील चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोन फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. अधिक तपास निरीक्षक वसंत पथवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार साळुंखे, विजय रुद्रे, पोलीस कर्मचारी करीत आहेत.