मेसनखेडेत दोन एकर कांदा रोपे गेली वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 23:05 IST2019-11-07T23:04:05+5:302019-11-07T23:05:00+5:30
चांदवड : तालुक्यातील मेसनखेडे शिवारातील गट नं. दोनशे अकरामधील रंजना संजय खताळ यांचे पाझर तलावालगतचे दोन एकर लागवड केलेले कांद्याचे क्षेत्र वाहून गेले.

चांदवड तालुक्यातील मेसनखेडे येथील रंजना खताळ यांचे दोन एकर कांद्याचे पीक मातीसह वाहून गेले.
चांदवड : तालुक्यातील मेसनखेडे शिवारातील गट नं. दोनशे अकरामधील रंजना संजय खताळ यांचे पाझर तलावालगतचे दोन एकर लागवड केलेले कांद्याचे क्षेत्र वाहून गेले.
जमिनीतील पूर्णपणे माती खरडली गेल्याने आत खडकावर आल्याने हे शेतकरी कुटुंब हतबल झाले असून, बळीराजा हवालदिल झाला आहे. गेल्या दीड महिन्यापासून नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे चांदवड तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी होते; परंतु दि. १ नोंव्हेबर रोजी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मेसनखेडे शिवारातील रंजना संजय खताळ या महिलेचे दोन एकर लागवड केलेल्या कांद्यातून पाझर तलावातील पाणी गेल्याने संपूर्ण कांदा पीक शेतातील मातीसहीत वाहून गेले आहे.
खताळ यांना कांद्याचे शेत तयार करण्यापासून ते लागवडीपर्यंत एक लाखाच्यावर खर्च आला आहे. शासनाने त्वरित नुकसानभरपाई
द्यावी, अशी मागणी खताळ यांनी केली आहे.