दोन एकर द्राक्ष बाग जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 15:44 IST2018-02-26T15:44:14+5:302018-02-26T15:44:14+5:30

सायखेडा : सावकारी आणि सरकारी कर्ज काढून चार वर्षांपूर्वी द्राक्षबागाचे पाहिलेले सुखी स्वप्न स्वत:च्या डोळ्यासमोर उद्ध्वस्त होताना पाहातांना कुटुंबाला किती वेदना होत असतील याचा प्रत्यक्ष अनुभव निफाड तालुक्यातील भुसे येथील शेतकरी प्रविण भुसारे यांना आला. भुसारे यांच्या गट नं. ७७७ मधील दोन एकर द्राक्ष बाग लोखंडी पोल उपसल्याने जमीनदोस्त झाली. यात सरासरी वीस लाख रु पयांचे नुकसान झाल्याने संसार उघड्यावर आला आहे.

Two acres of grape garden ground floor | दोन एकर द्राक्ष बाग जमीनदोस्त

दोन एकर द्राक्ष बाग जमीनदोस्त

सायखेडा : सावकारी आणि सरकारी कर्ज काढून चार वर्षांपूर्वी द्राक्षबागाचे पाहिलेले सुखी स्वप्न स्वत:च्या डोळ्यासमोर उद्ध्वस्त होताना पाहातांना कुटुंबाला किती वेदना होत असतील याचा प्रत्यक्ष अनुभव निफाड तालुक्यातील भुसे येथील शेतकरी प्रविण भुसारे यांना आला. भुसारे यांच्या गट नं. ७७७ मधील दोन एकर द्राक्ष बाग लोखंडी पोल उपसल्याने जमीनदोस्त झाली. यात सरासरी वीस लाख रु पयांचे नुकसान झाल्याने संसार उघड्यावर आला आहे.
भुसे येथील शेतकरी प्रविण भुसारे यांची म्हाळसाकोरे शिवारात असलेली दोन एकर द्राक्ष बाग आठिदवसावर तोडणीसाठी आली होती शनिवारी सकाळी आकरा वाजता बागेच्या मंडपाचे लोखंडी पोल वजनाने उपसुन द्राक्ष बाग जमीनदोस्त झाली. बँक व सोसायटीचे कर्ज घेऊन त्यांनी द्राक्ष बाग उभारली होती.पोटच्या पोरावानी जपलेल्या या बागेवर लाखो रु पये खर्च करु न एक्सपोर्ट पध्दतीने बाग कमवली होती. अवघ्या आठ दिवसावर व्यापार्याना देण्यासाठी आलेली बाग डोळ्या देखत जमीनदोस्त झाल्याचे पाहील्यावर शेतकर्याला रडु कोसळले. चालू हंगामात द्राक्ष उत्पादन सरासरी वाढल्याने बागेतून चांगले माल अपेक्षति होता. सध्या ३५ ते ४० रु पयांचा बाजार गृहीत धरल्यास किमान वीस लाखापर्यंत उत्पन्न अपेक्षति होते. मात्र बाग पडल्याने द्राक्ष खराब झाली तसेच बागेचे कायमचे नुकसान झाल्याने शेतकर्याचा हातातोडाचा घास हिरवला गेला.शेतकर्याचे नुकसान भरपाईची अपेक्षा केली आहे.

Web Title: Two acres of grape garden ground floor

टॅग्स :Nashikनाशिक