बाधितच्या तुलनेत दुप्पट कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2021 01:17 IST2021-10-18T01:16:34+5:302021-10-18T01:17:19+5:30

जिल्ह्यात रविवारी (दि.१७) एकूण ७३ नागरिक नव्याने बाधित झाले असून त्या तुलनेत सुमारे दुप्पट म्हणजे १४१ नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत.

Twice coronal free compared to infected | बाधितच्या तुलनेत दुप्पट कोरोनामुक्त

बाधितच्या तुलनेत दुप्पट कोरोनामुक्त

नाशिक : जिल्ह्यात रविवारी (दि.१७) एकूण ७३ नागरिक नव्याने बाधित झाले असून त्या तुलनेत सुमारे दुप्पट म्हणजे १४१ नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यातील बाधित नागरिकांपैकी ४८ नाशिक ग्रामीणचे, २२ नाशिक मनपाचे तर ३ जिल्हाबाह्य रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान जिल्ह्याच्या नाशिक ग्रामीणला एक आणि नाशिक मनपाचा एक अशा दोघांचा मृत्यु झाला असल्याने एकूण बळींची संख्या ८६५६ पर्यंत पोहोचली आहे. दरम्यान उपचारार्थींची संख्या ७११ वर तर प्रलंबित अहवालांची संख्या १४४ वर पोहोचली आहे.

Web Title: Twice coronal free compared to infected