काेरोनामुक्त होणाऱ्यांच्या तुलनेत दुप्पट बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 00:41 IST2021-06-26T00:41:00+5:302021-06-26T00:41:56+5:30
शहरात शुक्रवारी (दि.२५) तब्बल २५० नवे कोरोनाबाधित आढळून आले. १२८ जणांनी कोरोनावर मात केली. कोरोनामुक्तच्या तुलनेत दुप्पट बाधित आढळल्याने पुन्हा चिंतेचे वातावरण आहे.

काेरोनामुक्त होणाऱ्यांच्या तुलनेत दुप्पट बाधित
नाशिक : शहरात शुक्रवारी (दि.२५) तब्बल २५० नवे कोरोनाबाधित आढळून आले. १२८ जणांनी कोरोनावर मात केली. कोरोनामुक्तच्या तुलनेत दुप्पट बाधित आढळल्याने पुन्हा चिंतेचे वातावरण आहे.
दुसरी लाट ओसरल्यानंतर बाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत गेली. मात्र आता पुन्हा बाजारपेठा गर्दीने भरू लागल्याने बाधितांची संख्या वाढू लागली आहे. शुक्रवारी (दि. २५) १२८ बाधित बरे झाले तर २५० नवे बाधित आढळले आहेत त्यामुळे बाधितांची एकूण संख्या आता २ हजार ५६४ झाली आहे.
दरम्यान, गेल्या ४८ तासांत तीन रुग्णांचा मृत्यू झाला. यात जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दोन तर नाशिक शहरातील एका बाधिताचा समावेश आहे. जिल्ह्यात पोर्टलवर मृत्यू अपलोड करण्याचे काम सलग सुरूच आहे. शुक्रवारी दिवसभरात ५२ बळींची माहिती अपलोड करण्यात आली. त्यामुळे आत्तापर्यंत कोराेना बळींची संख्या ८ हजार २२४ झाली आहे.