खरेदीच्या बहाण्याने अडीच लाखांच्या दागिन्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 22:51 IST2018-06-26T22:51:13+5:302018-06-26T22:51:30+5:30

नाशिक : सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या तीन संशयित महिलांनी अडीच लाख रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना रविवारी (दि़२४) दुपारच्या सुमारास नाशिकरोडच्या बाफणा ज्वेलर्समध्ये घडली़ दरम्यान, महिलांची ही चोरी शोरूममधील सीसीटीव्हीत कैद झाली असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत़

Twenty two lakh jewelery theft by the purchase | खरेदीच्या बहाण्याने अडीच लाखांच्या दागिन्यांची चोरी

खरेदीच्या बहाण्याने अडीच लाखांच्या दागिन्यांची चोरी

ठळक मुद्देतीन संशयित महिला दागिने खरेदीच्या बहाण्याने आल्या़

खरेदीच्या बहाण्याने अडीच लाखांच्या दागिन्यांची चोरी

नाशिक : सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या तीन संशयित महिलांनी अडीच लाख रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना रविवारी (दि़२४) दुपारच्या सुमारास नाशिकरोडच्या बाफणा ज्वेलर्समध्ये घडली़ दरम्यान, महिलांची ही चोरी शोरूममधील सीसीटीव्हीत कैद झाली असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत़
नाशिकरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दत्तमंदिर स्टॉपजवळील बाफणा ज्वेलर्स या शोरूममध्ये दुपारी ३ वाजेच्या सुमारास तीन संशयित महिला दागिने खरेदीच्या बहाण्याने आल्या़ शोरूममधील कर्मचारी प्रदीप निंबा जावरे (रा. नारायणबापूनगर, लोखंडे मळा) यांना महिलांनी वेगवेगळे दागिने दाखविण्यास सांगितले़ त्यानुसार त्यांनी विविध प्रकारचे व डिझाइनचे दागिने व बांगड्या या महिलांना दाखविले़ जावरे बांगड्यांचे विविध प्रकार दाखवित असताना या महिलांनी अडीच लाख रुपये किमतीच्या सहा बांगड्या चोरून नेल्या़ या प्रकरणी जावरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नाशिकरोड पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे़

Web Title: Twenty two lakh jewelery theft by the purchase

टॅग्स :Crimeगुन्हा