इगतपुरी रेल्वेस्थानकात आढळली बेवारस एक वर्षाची मुलगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 00:35 IST2019-08-30T00:35:18+5:302019-08-30T00:35:38+5:30
इगतपुरी : इगतपुरी रेल्वेस्थानकात गुरुवारी (दि. २९) पहाटे साडेचारच्या सुमारास प्लॅटफार्म नंबर दोनवरील एका कॅन्टीनजवळील बाकड्यावर पिवळ्या रंगाच्या शालमध्ये लपेटलेल्या अवस्थेत एक वर्षाची मुलगी बेवारस सोडून कोणीतरी अज्ञाताने पलायन केले.

इगतपुरी रेल्वेस्थानकात आढळली बेवारस एक वर्षाची मुलगी
इगतपुरी : इगतपुरी रेल्वेस्थानकात गुरुवारी (दि. २९) पहाटे साडेचारच्या सुमारास प्लॅटफार्म नंबर दोनवरील एका कॅन्टीनजवळील बाकड्यावर पिवळ्या रंगाच्या शालमध्ये लपेटलेल्या अवस्थेत एक वर्षाची मुलगी बेवारस सोडून कोणीतरी अज्ञाताने पलायन केले.
पहाटे गस्तीवर असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना ही बालिका रडताना दिसली म्हणून त्यांनी आजूबाजूला चौकशी केली; मात्र कोणीही पालक समोर आले नाही, त्यामुळे या जवानांनी रेल्वे पोलिसांना या घटनेची माहिती दिली. रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या बालिकेस ताब्यात
घेतले.
लोहमार्ग सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुरारी गायकवाड, पोलीस हवालदार सतीश खर्डे, हेमंत घरटे, दीपक निकम यांनी ताब्यात घेतले असता या मुलीच्या अंगावर मारहाण झाल्याच्या खुणा दिसल्याने तिला ग्रामीण रु ग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले व त्यानंतर तिला नाशिकच्या बाल सुधारगृहात रवाना केले. या घटनेचा अधिक तपास रेल्वे पोलीस करीत आहेत.