तांत्रिक बिघाडामुळे वणीत विस तास विजपुरवठा खंडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 19:47 IST2019-12-05T19:45:27+5:302019-12-05T19:47:38+5:30
वणी : विद्युत प्रवाहात सहाय्यक असलेले कंडक्टर व इन्सूलेटर क्षतिग्रस्त झाल्याने वणी शहर विस तास अंधारात बुडाले आज बुधवारी तांत्रिक दुरु स्ती केल्यानंतर विद्युत पुरवठा पुर्ववत झाला.

तांत्रिक बिघाडामुळे वणीत विस तास विजपुरवठा खंडीत
लोकमत न्युज नेटवर्क
वणी : विद्युत प्रवाहात सहाय्यक असलेले कंडक्टर व इन्सूलेटर क्षतिग्रस्त झाल्याने वणी शहर विस तास अंधारात बुडाले आज बुधवारी तांत्रिक दुरु स्ती केल्यानंतर विद्युत पुरवठा पुर्ववत झाला. बुधवारी मध्यरात्रीचे सुमारास अचानक शहराचा विद्युत पुरवठा खंडीत झाला, याची बराच वेळ वाट पाहुनही विज न आल्याने विद्युत वितरण कंपनीच्या उपकेन्द्रात संपर्क करण्यात आला. नाट रिचेबल असे उत्तर मिळाल्याने शहरवासीयांनी रात्र अंधारात काढली गुरु वारी सकाळी 11 नंतर विद्युत पुरवठा पुर्ववत झाला. उपकेन्द्रातुन एका कंपनीला व शहराला विद्युत पुरवठा करणार्या वाहीन्या आहेत.
काही भागात वाहीनीचे कंडक्टर तुटले तर काही ठिकाणी ईन्सुलेटर फुटल्याने तांत्रिक बिघाड निर्माण होऊन पुरवठा बंद झाला होता. उपकेन्द्र तसेच काही ठिकाणी कालबाह्य तांत्रिक घटकाच्या आधारे विद्युत पुरवठा होतो वेळोवेळी तांत्रिक बिघाड निर्माण होतात व विद्युत पुरवठ्यावर याचा प्रतिकुल परिणाम होतो व शेतकरी व्यावसायिक घरगुती व औद्योगिक विज ग्रहाकांना याचा त्रास होतो. वेळीअवेळी निर्माण होणार्या तांत्रिक समस्याचे निराकारण करण्याची मागणी करण्यात येत आहे.