एक टन वजनाची वीस फुटी ट्रॉफी नवकार ग्रुपचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:49 IST2018-03-05T00:49:05+5:302018-03-05T00:49:05+5:30
नाशिक : शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटना व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे शहराची उत्तरोत्तर जडणघडण होत आहे.

एक टन वजनाची वीस फुटी ट्रॉफी नवकार ग्रुपचा उपक्रम
नाशिक : शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटना व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे शहराची उत्तरोत्तर जडणघडण होत आहे. अशा सामाजिक स्तरावर प्रयत्न करणाºया ‘नाशिक रत्न’ गौरव सोहळ्याप्रसंगी सुमारे एक टन वजनाची वीस फुटी ट्रॉफी नवकार ग्रुपच्या वतीने उभारण्यात आली होती. कुंभनगरी ते थेट देशाच्या वाइन राजधानीपर्यंत जागतिक नकाशावर नाशिक झळकले आहे. शहराच्या जडणघडणीत राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिक यांसह विविध मान्यवरांनी आपापल्या परीने योगदान दिले आहे. यापैकी काही नाशिक रत्नांचा गौरव नवकार ग्रुपच्या वतीने रविवारी (दि.४) करण्यात आला. यानिमित्ताने ग्रुपचे संचालक पारस लोहाडे यांच्या संकल्पनेतून तब्बल वीस फुटाची मेटलपासून तयार केलेली ट्रॉफी उभारण्यात आली होती. या ट्रॉफीचे अनावरण कॅनडा कॉर्नर येथील वसंत मार्केट येथे महापौर रंजना भानसी, आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध राजकीय पक्षांचे अध्यक्ष, संपादक, विविध शाळांचे मुख्याध्यापक, विविध क्र ीडा संघटना, औद्योगिक संघटना, स्वकर्तृत्वावर शहराचे नाव उंचविणाºया मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.