सिन्नर परिसरात कोरोनाचा बारावा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 11:29 PM2020-07-25T23:29:09+5:302020-07-25T23:51:31+5:30

सिन्नर: शहरासह तालुक्यात कोरोनाची स्थिती दिवसागणिक वाढत असून शुक्रवारी (दि.२४) शहरातील काजीपुरा भागातील ५८ वर्षीय बाधिताचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना कोरोनाने मृत्यू झाला. शहरातील हा चौथा मृत्यू असून तालुक्यातील मृतांची संख्या १२ झाली आहे.

Twelfth victim of Corona in Sinnar area | सिन्नर परिसरात कोरोनाचा बारावा बळी

सिन्नर परिसरात कोरोनाचा बारावा बळी

Next
ठळक मुद्देरुग्णसंख्या पाचशेच्या उंबरठ्यावर

सिन्नर: शहरासह तालुक्यात कोरोनाची स्थिती दिवसागणिक वाढत असून शुक्रवारी (दि.२४) शहरातील काजीपुरा भागातील ५८ वर्षीय बाधिताचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना कोरोनाने मृत्यू झाला. शहरातील हा चौथा मृत्यू असून तालुक्यातील मृतांची संख्या १२ झाली आहे.
दरम्यान, शनिवारी दुपारी शहरातील ७ तर ग्रामीण भागातील ७ असे एकुण १४ रुग्णांचे अहवाल कोरोनाबाधित असल्याचे प्राप्त झाले. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४९२ झाली आहे. आत्तापर्यंत शहरात ४ आणि ग्रामीण भागातील ८ जणांचा कोरोनाने बळी घेतला असून सिन्नर शहरासह वावी तसेच काही गावे संपूर्णत: लॉकडाऊन करुनही रुग्णवाढीचा वेग कायम आहे. शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालात शहरातील काजीपुरा ४, संजीवनीनगर २, देवीरोड १ असे एकुण ७ तर ग्रामीण भागात माळेगाव 3, गुळवंच, मानोरी, ठाणगाव, वडगाव-सिन्नर येथील प्रत्येकी 1 असे 7 मिळून तालुक्यात 14 रुग्णांची भर पडली आहे. तर शुक्रवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालामध्ये काजीपुरा येथील 69 वर्षीय महिला, सरदवाडी रोडवरील चाळीस वर्षीय पुरुष व कानडी मळ्यातील 44 वर्षाच्या रूग्णाचा समावेश आहे.

अटक केलेले आरोपी बाधित
पिंपळगाव बसवंत : शेतीच्या वादातून दोन गटांत झालेल्या हाणामारीप्रकरणी रेडगाव येथील चार संशयितांना एकदिवसीय पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्यातील तीन संशयित कोरोनाबाधित आढळल्याने पिंपळगाव पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे. बाधितांमध्ये ६४ व ३४ वर्षांच्या व्यक्तीसह ५५ वर्षाच्या महिलेचा समावेश आहे.

Web Title: Twelfth victim of Corona in Sinnar area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.