शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

अखेर तुकाराम मुंढे  यांची नाशिकमधून बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 1:25 AM

महापालिकेचे वादग्रस्त आयुक्त तुकाराम मुंढे यांची अखेर राज्य शासनाने बदली केली असून, त्यांच्या जागी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची नियुक्ती केल्याचे वृत्त आहे. मुंढे यांची बदली मात्र अन्यत्र नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आल्याचे वृत्त आहे.

नाशिक : महापालिकेचे वादग्रस्त आयुक्त तुकाराम मुंढे यांची अखेर राज्य शासनाने बदली केली असून, त्यांच्या जागी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची नियुक्ती केल्याचे वृत्त आहे. मुंढे यांची बदली मात्र अन्यत्र नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आल्याचे वृत्त आहे.  गेल्या नऊ महिन्यांपासून त्यांच्या बदलीसाठीचे प्रयत्न आणि अन्य चर्चा होत होत्या. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंढे यांच्या पाठीशी उभे राहिल्याने आमदारांसह महापौर आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी हा प्रतिष्ठेचा प्रश्न करूनही उपयोग होत नव्हता. आता फडणवीस यांनीच वरदहस्त काढून घेतल्याने मुंढे यांची बदली झाल्याने नगरसेवक आणि अधिकाºयांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असला तरी मुंढे समर्थक नागरिकांची बैठक गुरुवारी सायंकाळी होणार असून, त्या माध्यमातून आंदोलनाची तयारीदेखील सुरू झाली आहे.तुकाराम मुंढे यांची राज्य सरकारने अवघ्या नऊ महिन्यांत पुन्हा बदली केली आहे. गेल्या बारा वर्षातील मुंढे यांची ही अकरावी बदली आहे. त्यांची २०१६ पासूनची ही चौथी बदली आहे. आधी ते पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष, तत्पूर्वी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त होते आणि त्याही आधी सोलापूरचे जिल्हाधिकारी होते.नाशकात महापालिकेने संमत केलेली अडीचशे कोटी रुपयांची कामे रद्द करण्यावरून पहिली ठिणगी पडली. १ मार्चपासून त्यांनी वार्षिक भाडेमूल्यात सुधारणा करताना हरित पट्ट्यासह पार्किंग आणि अन्य मोकळ्या जागांवर करवाढ केल्याने आंदोलने पेटली. नाशिक महापालिकेत मुंढे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्याची घटना घडली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्तक्षेपामुळे ही नामुष्की टळली असली तरी त्यांच्यावर बदलीची टांगती तलवार होती. त्यानंतर आता गेल्या दोन दिवसांपासून बदलीची चर्चा सुरू होती. अखेरीस ती खरी ठरली.गमे नाशिकचे जावईमहापालिकेचे नूतन आयुक्त म्हणून येऊ घातलेले राधाकृष्ण गमे यांनी नाशिकमध्ये यापूर्वी निवासी जिल्हाधिकारी आणि अतिरिक्त आयुक्त म्हणून कामकाज केले आहे. मूळचे अहमदनगरचे असलेले गमे हे नाशिकचे जावईदेखील आहेत.नाशिक महापालिकेत ८ फेबु्रवारी रोजी आयुक्त म्हणून सूत्रे स्वीकारणाºया तुकाराम मुंढे यांचा कायद्यावर बोट ठेवून काम करण्याचा फटका लोकप्रतिनिधींना बसला आणि त्यातून त्यांच्या वादग्रस्त कारकिर्दीला सुरुवात झाली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे