क्षयरुग्ण आणि कुष्ठरुग्ण शोधमोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:21 IST2020-12-05T04:21:07+5:302020-12-05T04:21:07+5:30
मानोरी : कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोधण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण मोहीम व कुष्ठरोग शोध अभियान ...

क्षयरुग्ण आणि कुष्ठरुग्ण शोधमोहीम
मानोरी : कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोधण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण मोहीम व कुष्ठरोग शोध अभियान १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत राज्यभर राबविण्यात येत असून, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून यासंदर्भाचे पत्र सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आले आहे.
सदर पत्रात विविध उपाययोजना सुचविल्या आहेत. रोग शास्रीय अभ्यासानुसार दोन्ही आजारांचे रुग्ण निदान व उपचारापासून वंचित राहिल्यास रुग्णांना या रोगापासून निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीचा सामना करावा लागतो. तसेच या रुग्णांच्या सहवासातील इतर लोकांनाही क्षयरोग आणि कुष्ठरोगाची लागण होण्याचा धोका संभवत असल्याने क्षयरुग्ण आणि कुष्ठरुग्ण यांचा शोध घेऊन औषधोपचार करणे गरजेचे असल्याचे पत्रात नमूद केले आहे. ग्रामस्थांना या मोहिमेत सहभागी होण्यास लोकप्रतिनिधीनी प्रेरित करण्याचेदेखील आवाहन करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात गृहभेटीसाठी पथके तयार करण्यात येणार आहेत.