महिलेची पोत लांबविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2021 22:42 IST2021-09-28T22:40:44+5:302021-09-28T22:42:34+5:30

पिंपळगाव बसवंत : परिसरातील सुरभी मार्केट परिसरातून दोन महिला जात असताना, मोटारसायकलवरून आलेल्या दोघा भामट्यांनी धूम स्टाईलने महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविण्याचा प्रयत्न केला.

Trying to lengthen the woman's texture | महिलेची पोत लांबविण्याचा प्रयत्न

महिलेची पोत लांबविण्याचा प्रयत्न

ठळक मुद्देमहिलेच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव फसला.

पिंपळगाव बसवंत : परिसरातील सुरभी मार्केट परिसरातून दोन महिला जात असताना, मोटारसायकलवरून आलेल्या दोघा भामट्यांनी धूम स्टाईलने महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविण्याचा प्रयत्न केला.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी या चोरट्याचा बंदोबस्त लावावा, अशी मागणी होत आहे. पिंपळगाव बसवंत परिसरातील सुरभी मार्केट जुना आग्रा रोड परिसरातून दोन महिला जात असताना, अज्ञात भामट्यांनी काळ्या रंगाच्या पल्सरवर पाठीमागून येत, महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावण्याचा प्रयत्न केला असताना, महिलेच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा डाव फसला. मात्र, महिलेच्या गळ्याला इजा झाली असून, या घटनेबाबत महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: Trying to lengthen the woman's texture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.