चारचाकीने उडवून जिवे मारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 00:20 IST2018-05-30T00:20:26+5:302018-05-30T00:20:26+5:30
जमिनीचा प्लॉट महाग दिल्याच्या कारणातून धमकी देत संशयिताने आपल्या चारचाकी कारने एकास उडवून देत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी (दि. २६) दुपारी पंचवटीतील अमृतधाम परिसरात घडली असून, या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चारचाकीने उडवून जिवे मारण्याचा प्रयत्न
नाशिक : जमिनीचा प्लॉट महाग दिल्याच्या कारणातून धमकी देत संशयिताने आपल्या चारचाकी कारने एकास उडवून देत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी (दि. २६) दुपारी पंचवटीतील अमृतधाम परिसरात घडली असून, या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंचवटीतील पारिजात अपार्टमेंटमधील रहिवासी वैभव ठाकरे या संशयिताने अमृतधाम परिसरातील गंगोत्री विहार येथील रहिवासी संदीप प्रभाकर महाले यांना पाठीमागून चारचाकी वाहनाने धडक देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकारात महाले जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित ठाकरे हा दुपारी दीड वाजता संदीप महाले यांच्या घराजवळील गार्डनलगत भेटून, तू मला फार महाग प्लॉट दिला आहे, आताच्या आता मला पाच लाख रु पये दे नाही तर मी तुला व तझ्या घरच्यांना मारून टाकीन, असा दम दिला होता. त्यानंतर संदीप महाले घरी परत चालले असताना आरोपीने त्यांना मागून चारचाकीने धडक दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात संशयिताविरु द्ध प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक योगिता जाधव या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.