सुरगाणा येथे मोबाइल दुकाने फोडण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 18:31 IST2019-07-20T18:31:32+5:302019-07-20T18:31:50+5:30
सुरगाणा शहरात घरातून रोकड चोरी, मोबाइल चोरी, मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच असून, येथील दोन मोबाइलची दुकाने फोडण्याचा असफल प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी पुन्हा केल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सुरगाणा येथे मोबाइल दुकाने फोडण्याचा प्रयत्न
सुरगाणा : शहरात घरातून रोकड चोरी, मोबाइल चोरी, मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच असून, येथील दोन मोबाइलची दुकाने फोडण्याचा असफल प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी पुन्हा केल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरासह तालुक्यातील विविध ठिकाणी मोटारसायकल चोरीच्या घटना गेल्या काही महिन्यांपासून घडत असून, चोरटे हाताशी येत नसल्याने दुचाकीधारकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. विशेषत: पार्किंगमध्ये किंवा घराजवळ उभी केलेली नवीन दुचाकी चोरी केली जात आहे. भुरट्या चोरी नित्याचे झाले असून, काही दिवसांपूर्वी येथे घरफोडी झाली होती. त्यानंतर येथील होळी चौकातील तनुजा मोबाइल शॉपी व भूमी मोबाइल शॉपी ही शेजारी असलेली दोन्ही दुकाने रात्रीच्या वेळी मागच्या बाजूने भगदाड पाडून फोडण्याचा चोरट्याने असफल प्रयत्न केला. सदर प्रकार सकळी लक्षात आल्यानंतर याबाबत मोबाइल व्यावसायिक अविनाश भोये व दिगंबर जोपळे यांनी पोलिसांत तक्र ार दिली असून, त्यांच्यासह या परिसरातील व्यावसायिकांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. तर पोलीस यंत्रणादेखील मागावर असून चोरटा लवकरच हाती लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.