#MeToo: खरं-खोटं सगळं बाहेर येईल, गावांमध्येही पोहोचावी 'मीटू' चळवळ- अमृता फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 18:54 IST2018-10-17T16:42:49+5:302018-10-17T18:54:55+5:30
मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस यांनी me tooच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

#MeToo: खरं-खोटं सगळं बाहेर येईल, गावांमध्येही पोहोचावी 'मीटू' चळवळ- अमृता फडणवीस
नाशिक- मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती अमृता फडणवीस यांनी me tooच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. नाशिक येथे एका कार्यक्रमास उपस्थित असलेल्या अमृता फडणवीस म्हणाल्या, मीटू आज शहरांमध्येच मर्यादित आहे आणि जास्त करून बॉलिवूडमध्ये पसरलं आहे. बॉलिवूडमधल्या बायका पुढे येऊन सांगताय. पण असे प्रसंग प्रत्येक पातळीच्या स्त्रीवर येतात.
गावांमध्ये याची जागरुकता होणं गरजेचं आहे. खरी शोषित महिला पुढे येऊन स्वतःचा बचाव करतेय, तसेच दुस-याला त्यासाठी जागरूक करेल. यात खरं आणि खोटं सगळं बाहेर येईल, असे प्रसंग होतायत ही खरी गोष्ट आहे. परंतु या महिलांचं ऐकून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी एक वेगळी कमिटी तयार होणार आहे. अशा प्रकरणात पॉजसारखे कायदे महिलांना साह्य करतील.
मला असं वाटतं, बदल आणणारे आपण आहोत. जनतेच्या मतांनुसारच वागलं पाहिजे. यावेळी त्यांनी सबरीमाला मंदिरातल्या महिलांच्या प्रवेशावरही प्रतिक्रिया दिली आहे. कोणतीही मंदिरं किंवा देवस्थानांमध्ये महिलांना प्रवेश मिळालाच पाहिजे. अशा गोष्टी बदलण्यासाठी लोकांनी पुढे येण्याची गरज असल्याचंही मत अमृता फडणवीस यांनी मांडलं आहे.