शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

ट्रुनॅट मशीन रुग्णालयांमध्ये दाखल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 18:53 IST

नाशिक : नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन हॉस्पिटलमध्ये व मालेगावच्या सामान्य रुग्णालयात ट्रुनॅट मशीन दाखल झाले आहे. या मशीनवर कोरोना रुग्णाच्या नमुन्यांची प्राथमिक चाचणी करण्यात येणार असून, आयसीएमआर या राष्टय संस्थेकडून चाचण्या सुरू करण्याचे आदेश मिळताक्षणी नुमन्यांच्या तपासणीस प्रारंभ करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देनमुन्यांची प्राथमिक चाचणी आयसीएमआरकडून आदेश मिळताक्षणी नुमन्यांच्या तपासणीस प्रारंभ

नाशिक : नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन हॉस्पिटलमध्ये व मालेगावच्या सामान्य रुग्णालयात ट्रुनॅट मशीन दाखल झाले आहे. या मशीनवर कोरोना रुग्णाच्या नमुन्यांची प्राथमिक चाचणी करण्यात येणार असून, आयसीएमआर या राष्टय संस्थेकडून चाचण्या सुरू करण्याचे आदेश मिळताक्षणी नुमन्यांच्या तपासणीस प्रारंभ करण्यात येणार आहे.सध्य:स्थितीत नाशिक शहरातील बाधितांच्या किंवा अन्य उपचारांसाठीदेखील दाखल होणाऱ्या कोविड संशयितांच्या नमुन्यांची तपासणी पुण्याच्या प्रयोगशाळेत तर मालेगावच्या संशयितांची तपासणी धुळ्याच्या वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड तपासणी केंद्रात केली जाते. क्षयरोग विभागाकडून या दोन मशीन्सना राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरकडे सुपुर्द करण्यात येणार होते. परंतु, नागपूरपेक्षा नाशिक शहर आणि जिल्ह्याची स्थिती अधिक बिकट असल्याचे यंत्रणेच्या लक्षात आले. त्यामुळे नाशिक आणि मालेगाव शहराच्या वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करून हे ट्रुनॅट मशीन नाशिकच्या दोन रुग्णालयांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या मशीनवरील चाचण्यांची नोंददेखील आयसीएमआरच्या साइटवर केली जाते.इन्फोएकावेळी दोन चाचण्याट्रुनॅट मशीन हे एकाचवेळी दोन रुग्णांच्या थुंकीच्या नमुन्यांची चाचणी करता येते. साधारणपणे दीड तासात दोन्ही चाचणीचा अहवाल मिळू शकतो. दाट संशयित किंवा एखादा अन्य आजाराने बाधित मात्र त्या उपचारापूर्वी कोरोना निगेटिव्ह टेस्ट मिळणे अपेक्षित असलेल्या रुग्णांची मोठी सोय होणार आहे. त्यामुळे आता दिवसभराच्या कामकाजाच्या वेळेत डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात २४ ते २६ चाचण्या आणि तेवढ्याच चाचण्या मालेगावच्या सामान्य रुग्णालयातील तपासणी केंद्रात होऊ शकणार आहेत.टीबीचा प्रादुर्भाव तपासण्यासाठी अत्यंत प्रभावी मानल्या गेलेल्या सीबीनॅट आणि ट्रुनॅट मशीनमध्ये काही तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. कोविड तपासणीसाठी त्यात वेगळे सॉफ्टवेअर आणि चीप बसवण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीच्या डीएनएनचे अ‍ॅँप्लिफिकेशन करून तो विषाणू आहे की नाही ते मशीन शोधून काढते. त्यातील किटदेखील सज्ज करण्यात आले असून, आयसीएमआर या कोविडबाबतच्या राष्टय संस्थेकडून त्याबाबतचा हिरवा कंदील मिळताच चाचण्यांना नाशिकमध्ये प्रारंभ करण्यात येणार आहे.

 

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या