ट्रक टर्मिनसमधून ट्रकची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:50 IST2018-08-15T00:49:49+5:302018-08-15T00:50:08+5:30

ट्रक टर्मिनसमधून ट्रकची चोरी
नाशिक : ट्रक टर्मिनसमधून पावणेतीन लाख रुपयांच्या बारा टायरचा ट्रक चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे़ कलिमोद्दीन चिरागोद्दीन शेख (अंजनशहा सोसायटी, धुळे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २९ जुलै ते दि. ५ आॅगस्ट या कालावधीत चोरट्यांनी त्यांचा १२ टायरचा ट्रक (एमएच १८, एए ७७३६) आडगाव शिवारातील ट्रक टर्मिनसजवळून चोरून नेला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ गेल्या काही दिवसापासून येथील ट्रकच्या स्पेअरपार्टसची चोरी होण्याचे प्रमाण वाढले असताना आता थेट ट्रकच चोरी गेल्योने चिंता वाढली आहे.