ट्रकचालकाने केला १४ लाखांचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:41 IST2018-02-24T00:41:39+5:302018-02-24T00:41:39+5:30
शरदचंद्र पवार मार्केड यार्डातून व्यापाºयाने खरेदी केलेली १४ लाख रुपयांची द्राक्षे व डाळींब ट्रकमध्ये भरून दिल्यानंतर ट्रक सांगितलेल्या ठिकाणी न पोहोचवता त्यातील मालाचा ट्रकचालकाने अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

ट्रकचालकाने केला १४ लाखांचा अपहार
नाशिक : शरदचंद्र पवार मार्केड यार्डातून व्यापाºयाने खरेदी केलेली १४ लाख रुपयांची द्राक्षे व डाळींब ट्रकमध्ये भरून दिल्यानंतर ट्रक सांगितलेल्या ठिकाणी न पोहोचवता त्यातील मालाचा ट्रकचालकाने अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पंचवटी पोलीस ठाण्यात ट्रान्सपोर्ट व्यावसायिक करण भट (रा़ तारवालानगर, दिंडोरीरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे़ १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास त्यांनी बारा टायरच्या ट्रकमध्ये (पीबी ०२, सीसी ९४४५) १४ लाख २३ हजार २७० रुपयांची १९ टन द्राक्षे व डाळिंबे भरली व ट्रकचालकास कोणत्या ठिकाणी हा माल घेऊन जायचा त्याबाबत सांगितले़ मात्र, ट्रकचालकाने १९ टन द्राक्षे व डाळिंबे ही सांगितलेल्या ठिकाणी घेऊन गेलाच नाही़ याबाबत भट यांनी संबंधित ठिकाणी मालाची चौकशी केली असता हा प्रकार समोर आला़ त्यांनी पंचवटी पोलीस ठाणे गाठून ट्रकचालकाविरोधात फिर्याद दिली़