पिंपरी फाट्यावर ट्रकची ट्रकला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2022 00:08 IST2022-02-13T00:08:37+5:302022-02-13T00:08:57+5:30
इगतपुरी : येथील पिंपरी फाट्यावर शनिवारी (दि.१२) सकाळी मुंबई आग्रा महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून येणारा ट्रक आदळल्याने भीषण अपघात झाला. त्यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत.

पिंपरी फाट्यावर ट्रकची ट्रकला धडक
इगतपुरी : येथील पिंपरी फाट्यावर शनिवारी (दि.१२) सकाळी मुंबई आग्रा महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून येणारा ट्रक आदळल्याने भीषण अपघात झाला. त्यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत.
इगतपुरी येथील मुंबई नाशिक महामार्गावर पिंपरी फाटा परिसरात टायर पंक्चर झाल्यामुळे दोन ट्रक हायवेच्या कडेला उभे होते. पंक्चर काढण्यासाठी उभ्या असलेल्या एका ट्रकला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक धडक दिली. यामुळे एक ट्रक रस्त्याच्या शेजारी असलेल्या नाल्यात कोसळला या अपघातात दोघे जण जखमी झाले.
धडक दिल्यानंतर मागील ट्रकचा चालक घटनास्थळावरुन पसार झाला. त्यानंतर महामार्ग वाहतूक पोलीस यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत जखमींना पुढील उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. पोलीस दुसऱ्या पसार झालेल्या ट्रक चालकाचा शोध घेत आहेत. दोन्ही ट्रक बाजूला करण्याचे काम सुरू असून वाहतूक सुरळीत सुरू केली आहे.