पाथरे येथील कोरोना चेकपोस्टला ट्रकची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 00:03 IST2020-05-26T21:03:44+5:302020-05-27T00:03:33+5:30
पाथरे : नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरील वावी पोलिसांच्या कोरोना चेकपोस्टला आयशर ट्रकने धडक दिल्याने कर्तव्यावरील शिक्षक जखमी झाला. सिन्नर-शिर्डी रस्त्यावर पाथरे चेक पोस्टवर सोमवारी अपघात झाला.

पाथरे येथील कोरोना चेकपोस्टला ट्रकची धडक
पाथरे : नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरील वावी पोलिसांच्या कोरोना चेकपोस्टला आयशर ट्रकने धडक दिल्याने कर्तव्यावरील शिक्षक जखमी झाला. सिन्नर-शिर्डी रस्त्यावर पाथरे चेक पोस्टवर सोमवारी अपघात झाला.
सिन्नर येथून गॅस सिलिंडर घेऊन जाणारा आयशर ट्रक (क्र. १७ टी २८३५) पाथरे येथील पोलीस चौकी येथे चालकाने बॅरिकेड्स उडवत पोलीस चौकीही उडवली. या अपघाताच्या आयशरने एक स्कूटीही उडवली. यात आयशर चालक हा दारूच्या नशेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कोरोना चेक पोस्टवर जिल्हा बंदी असल्याने यावेळी दोन माध्यमिक शिक्षक तपासणी कर्मचारी म्हणून काम पाहत होते. त्यातील वावी येथील नूतन विद्यालयातील शिक्षक सुनील डुकरे यांना आयशरच्या धडकेने त्यांचा खांद्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना पाथरे श्रीराम मित्रमंडळाच्या रुग्णवाहिकेत सिन्नर येथील दवाखान्यात उपचारासाठी हलविण्यात आले. गंभीर मार असल्याने अधिक उपचारासाठी त्यांना नाशिक येथे हलविण्यात आले.
नाशिक चेकपोस्टवरील दोन पोलीस कर्मचारी हे वेळीच सावध झाल्याने बचावले. नगर चेकपोस्ट वरील दोन होमगार्डही यात बचावले. शिक्षकांना अपघाती विमा व आरोग्य विमा संरक्षण मिळावे अशी मागणी होत आहे. पुढील तपास वावी पोलीस सहायक निरीक्षक रणजित गलांडे करीत आहे.