कांद्याने भरलेला ट्रक उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 01:13 IST2020-08-25T23:07:43+5:302020-08-26T01:13:02+5:30
लासलगाव : विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावर लासलगाव रेल्वे गेटजवळ रस्त्याच्या कडेला साइडपट्ट्या नसल्याने कांद्याने भरलेला ट्रक रस्त्याच्या खाली घसरून पलटी झाला. ही घटना सोमवारी (दि. २४) रात्री उशिरा घडली.

कांद्याने भरलेला ट्रक उलटला
लासलगाव : विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावर लासलगाव रेल्वे गेटजवळ रस्त्याच्या कडेला साइडपट्ट्या नसल्याने कांद्याने भरलेला ट्रक रस्त्याच्या खाली घसरून पलटी झाला. ही घटना सोमवारी (दि. २४) रात्री उशिरा घडली. यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली जरी नसली तरी कांदा व ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. येथून रेल्वे मालगाडीने बांगलादेशात कांदा निर्यात सुरू असल्याने रेल्वेने कांदा पाठवण्यासाठी सटाणा येथील व्यापाऱ्याचा कांदा ट्रकमधून (एमएच ४१ जी ५७२६) लासलगाव येथे घेऊन येत असताना येथील रेल्वे गेटजवळील रस्त्यालगत साइडपट्ट्या नसल्याने एक ते दीड फुटाचा खड्ड्यात ट्रक उतरल्याने पलटी झाला. याअगोदर एक कंटेनर वीस ते पंचवीस दिवसांपूर्वी पलटी होऊन एका टपरीचे मोठे नुकसान झाले होते. मात्र या दोन्ही घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही.