खोल दरीत ट्रक कोसळून चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 15:38 IST2021-06-03T15:37:51+5:302021-06-03T15:38:01+5:30

इगतपुरी : जुना कसारा घाटात ट्रक चालकाचा वाहनवारील ताबा सुटल्याने ट्रक दरीत कोसळून झालेल्या अपघातात चालक ठार तर क्लिनर ...

The truck crashed into a deep ravine, killing the driver | खोल दरीत ट्रक कोसळून चालक ठार

खोल दरीत ट्रक कोसळून चालक ठार

इगतपुरी : जुना कसारा घाटात ट्रक चालकाचा वाहनवारील ताबा सुटल्याने ट्रक दरीत कोसळून झालेल्या अपघातात चालक ठार तर क्लिनर जखमी झाला आहे. मुंबईहून नाशिककडे ट्रक क्रमांक एमएच -१५ - जेजी -०२९७ जात असतांना जुन्या कसारा घाटात पहाटेच्या साडेतीन वाजेच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक कसारा घाटातील दरीत ३०० फुटावर जाऊन आदळला.
त्यात गाडीचा चालक सोमनाथ भिकाजी उशिरे (वय २३ वर्ष रा .नासिक) हा मरण पावला तर गाडीचा क्लिनर तुषार शिंदे (२७) हा गंभीरित्या जखमी झाला. त्याला टोलच्या नासिक एक्स्प्रेसवेच्या रुग्ण वाहिनीने इगतपुरी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. घटनेची माहिती मिळताच मुंबई एक्सप्रेसवेचे गस्त पथक रवि देहाडे त्यांचे सहकारी दीपक मावरिया , धीरज सोनावणे , रवि दुर्गुडे , तसेच घोटी महामार्गाचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस .के. हिरे , एन एस सोनावणे, एस .पी .सावकार , एच एम गुजरे , पी . सी . आहिरे आदींच्या यांच्या प्रयत्नांनंतर ट्रक चालक सोमनाथ भिकाजी उशिरे व क्लिनर तुषार शिंदे यांना दरीतून काढण्यात आले. पहाटेच्या अंधारामुळे ट्रक चालक व क्लिनर दोघानाही शोधण्यात अडथळा येत होता.

Web Title: The truck crashed into a deep ravine, killing the driver

टॅग्स :Nashikनाशिक