कोलती नदीवरील पूल खड्ड्यांमुळे अडचणीचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 01:10 IST2020-07-24T22:04:37+5:302020-07-25T01:10:45+5:30
देवळा येथे विंचूर - प्रकाशा महामार्गावर कोलती नदीवर असलेल्या पुलावर खड्डे पडल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. विंचूर प्रकाशा महामार्गावरून आंतरराज्य वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. यात अवजड वाहनांचे प्रमाण लक्षणीय आहे. वाहनचालकांना या पुलावरील खड्डे चुकवत जातांना कसरत करावी लागत असल्यामुळे चालक त्रस्त झाले आहेत.

कोलती नदीवरील पूल खड्ड्यांमुळे अडचणीचा
देवळा येथे विंचूर - प्रकाशा महामार्गावर कोलती नदीवर असलेल्या पुलावर खड्डे पडल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. विंचूर प्रकाशा महामार्गावरून आंतरराज्य वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. यात अवजड वाहनांचे प्रमाण लक्षणीय आहे. वाहनचालकांना या पुलावरील खड्डे चुकवत जातांना कसरत करावी लागत असल्यामुळे चालक त्रस्त झाले आहेत. गतवर्षी या रस्त्यावर खड्डे दुरूस्ती करतांना सार्वजनिक बांधकाम विभागाने कामाच्या दर्जाकडे दुर्लक्ष केले होते. त्यावेळी वापरली जाणारी खडी व ग्रीट निकृष्ठ दर्जाची व ओली असल्यामुळे त्यावर डांबर टाकल्यानंतर ती एक जीव झाली नव्हती. शासकीय निकषानुसार दुरूस्ती झाली नाही. यामुळे सदर खडी लवकरच उखडून खड्डे परत जैसे थे झाले आहेत. वाजगाव येथून वडाळे गावाकडे जाण्यासाठी कोलती नदीवर असलेल्या पुलाची दुरवस्था झाली आहे. पावसाळयात रामेश्वर धरण ओव्हर फ्लो झाल्यानंतर त्याचा पाण्याचा फुगवटा कोलती नदीपात्रात वाजगाव गावापर्यंत येतो. हे नदीपात्र ओलांडून वडाळे गावाकडे जाण्याचा रस्ता आहे. पूर्वी या नदीवर पुल नसल्यामुळे नदीला पाणी असतांना किंवा पूर आल्यानंतर वाजगाव वडाळा गावाचा संपर्क तुटत असे . वाजगाव, वडाळा, कोलते शिवार, राजंदरा आदी भागातील शेतकरी, विद्यार्थी, व ग्रामस्थांच्या मागणीनंतर कोलती नदीवर कठडे नसलेला सबमर्सिबल पूल (बुडता पूल ) बांधण्यात आला. त्यानंतर देखभाल अथवा दुरूस्ती मोठे खड्डे निर्माण झाले आहेत.