पांढूर्ली घाटात तिहेरी अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 17:15 IST2018-08-06T17:15:00+5:302018-08-06T17:15:10+5:30
सिन्नर : सिन्नर - घोटी महामार्गावरील पांढुर्ली घाटात रविवारी (दि.५) दुपारी बारा वाजेच्या दरम्यान आयशर टेम्पो, स्विफ्ट कार व डंपर या तीन वाहनांचा अपघात झाला.

पांढूर्ली घाटात तिहेरी अपघात
अपघातात स्विफ्ट कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. सुदैवाने जीवितहानी टळली असून कारमधील दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. स्विफ्ट कार घोटीहून सिन्नरच्या दिशेने येत होती. कारच्या पाठीमागून आयशर टेम्पो भरधाव वेगाने येत होता. समोरून येणाऱ्या डंपरने कट मारल्याने चालकाने कार थांबविली. त्यामुळे पाठीमागून आलेला आयशर कारवर आदळला.