The trio hit Dalla in the makeup studio | मेकअप स्टुुडिओत तिघींनी मारला डल्ला

मेकअप स्टुुडिओत तिघींनी मारला डल्ला

नाशिक : इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील पांडवनगरी परिसरात असलेल्या संगीता ब्रायडल मेकअप स्टुडिओचे कुलूप बनावट किल्लीचा वापर करत उघडून दुकानामधील विविधप्रकारचे सुमारे ७० हजार रुपये किमतीचे साहित्य तिघा महिला चोरांनी लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी स्टुडिओचालक संगीता भरत लोहार (४१,रा. हरिओम रेसिडेन्सी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित अंजली लोहार, पूजा जाधव व स्वाती वानखेडे यांच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या संशयित महिलांनी बनावट किल्लीचा वापर दुकानातून विविध कंपन्यांचे आयब्रो डिफायनर दोन नग, फरसाळी आॅइल, सेटिंग स्प्रे, आयशॅडो पॅलेट, ब्लशर पॅलेट, कार्बन टोनर, क्रीम्पिंग मशीन, स्ट्रेटिंग मशीन असे विविध प्रकारचे रंगभूषा साहित्य व यंत्रासह एकूण ७० हजारांचा माल लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या तिघींनी दुकानाचे लॅचलॉक एका बनावट किल्लीद्वारे उघडल्याचास संशय व्यक्त करण्यात आला आहे.
पतीच्या मित्राकडून पत्नीचा विनयभंग
नाशिक : उसनवार दिलेले पैसे घेण्यासाठी घरी आलेल्या पतीच्या मित्रानेच विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना दिंडोरीरोड परिसरात घडला. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुरुवारी (दि.९) दिंडोरीरोडवरील आपल्या मित्राकडे संशयित रमेश काळे हा उसनवार दिलेले पैसे घेण्यासाठी संध्याकाळी आला. यावेळी संशयित काळे याने घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत विवाहितेला ‘तुझा नवरा माझे पैसे उसने घेतले आहे, ते का देत नाही’ असा जाब विचारत मित्राच्या पत्नीचा हात धरून विनयभंग केल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: The trio hit Dalla in the makeup studio

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.